Wakad News : वाकड पोलीस ठाण्यातील शिबिरात 132 रक्त पिशव्यांचे संकलन

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस स्टेशन आणि ग्राम सुरक्षा दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 132 जणांनी रक्तदान केले. रविवारी (दि. 18) सकाळी नऊ ते दुपारी पाच या कालावधीत हे शिबीर पार पडले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस आणि नागरिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ निरीक्षकांना दिल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिरात ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र संघटना, पी डी फाउंडेशन, थेरगाव सोशल फाउंडेशन, नेहरूनगर सोसायटी, लायन्स क्लब, नागरिकांनी सहभाग घेतला. एकूण 132 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस कर्मचारी हेमंत हांगे, सचिन सुतार, मधुकर कोळी, सचिन सापते, स्वप्नील लोखंडे, पी डी पाटील फाउंडेशनचे औदुंबर कळसाईत, लायन्स क्लबचे अनिल झोपे, थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, पोलीस मित्र संघटनेचे शहाजी भोसले आदींनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले. कोरोना साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याबाबत सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.

उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले. पोलीस निरीक्षक (गुन्हे 1) संतोष पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.