Wakad : दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्यावरून इसमाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.

अनिल भीमराव नाईकवाडे (वय 49, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमनाथ घोगरे (रा. गुरुनानक नगर, साने गुरुजी शाळेमागे, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ याने अनिल यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यासाठी अनिल यांनी नकार दिला. या रागातून सोमनाथ याने हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड अनिल यांना मारला. यामुळे अनिल यांच्या कानाला दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.