Wakad News: पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

विवाहितेच्या छळ प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन तिचा वेगवेगळ्या कारणांवरून त्रास दिल्याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासू, सासरे आणि भावाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 मार्च 2018 पासून 22 ऑगस्ट 2020 या कालावधीत रहाटणी येथे घडला.

पती शेखर जगदीश पाटील (वय 26), सासरे जगदीश पाटील, सासू रेखा जगदीश पाटील, भावजय सेजल पाटील (सर्व रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ​याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी विवाहितेचा लहान-लहान कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ केला. विवाहितेचे वारंवार सासरच्या मंडळींशी वाद होत असल्याने त्यांनी पतीला नांदेड सिटी येथे राहण्यास जाण्याची विनंती केली. त्यावरून पतीने विवाहितेला शिवीगाळ करून अपमान केला. तसेच पतीने मागील दोन वर्षांपासून फिर्यादी विवाहीतेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन त्यांचा मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.