Wakad News : व्हॉट्सअप वरून महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला वारंवार फोन करणे तसेच व्हॉट्सअप वरून मेसेज व व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ते दोन ऑगस्ट या काळात वाकड येथे घडली.

याप्रकरणी संबंधित महिलेने शुक्रवारी (दि.4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोबाईल वरून संपर्क साधणा-या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला 7058225310 या मोबाईल नंबर वरून अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. या व्यक्तीने महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. फिर्यादी महिलेने विरोध दर्शवला तरीही या व्यक्तीने महिलेला व्हाट्सअप वरून मेसेज व व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे केले. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.