Wakad News: जिरे व्यापाऱ्याची पावणे आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जिरे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याकडून पाच टन जिरे नेले. त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची सात लाख 82 हजार 252 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 20 सप्टेंबर 2020 ते 23 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडली.

राकेश उत्तमराव पाटील (वय 37, रा. वाकड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अनिल कुमार चौधरी (रा. नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश), लतिका उर्फ लतिकेश राणा (रा. गोविंद पुरी, साऊथ दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश हे जिरे व्यापारी आहेत. आरोपींनी राकेश यांच्याकडून विश्वास संपादन करून सात लाख 82 हजार 252 रुपयांचे पाच टन जिरे नेले. त्याचे राहिलेले पैसे आरोपींनी दिले नाहीत. ज्या बँक खात्यात पैसे नाहीत त्या बँक खात्याचा धनादेश राकेश यांना दिला. राकेश यांनी धनादेश बँकेत जमा केला असता तो आरोपींच्या खात्यावर पैसे नसल्याने बाऊन्स झाला. याबाबत राकेश यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.