Wakad News : वाकड परिसरात सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज – वाकड-थेरगाव-कस्पटेवस्ती या भागात सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरसेवक मयुर कलाटे यांना निवेदन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे भवन उभारावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

चखाले यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाकड-थेरगाव-कस्पतेवस्ती या भागात सांस्कृतिक, समाजापयोगी व इतर कर्यक्रम घेण्यासाठी सभागृह नाही. पर्यायी हे कार्यक्रम रस्त्यावरच घेतले जातात. त्यामुळ वाहातूकीच्या व इतर समस्या निर्माण होतात. या भागातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत असल्याने सांस्कृतिक भवनाची गरज आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनाची प्रत नगरसेवक मयुर कलाटे यांच्यासह नगरसेवक राहुल कलाटे व सिद्धेश्वर बारणे यांना देण्यात आली आहे.

यावेळी सागर गायकवाड, बाळासाहेब शिंदे, नितीन पटेकर, बरकत शेख, संतोष ऊल्हारे, शाकीर शेख, किशोर खंडागळे, जयवंत गायकवाड आदि उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.