Wakad News : वाकड परिसरातील झोपडपट्टी मधील लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – काळाखडक, म्हातोबानगर आणि आण्णाभाऊ साठे नगर या झोपडपट्टी भागातील लहान मुलांची पालिकेच्या वतीने आरोग्य तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी दादेवार यांना दिपक चखाले यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोना संकटाचा सामना सर्वजन करत आहेत, लस उपलब्ध झाली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. तसेच, संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील लहान मुलांची आरोग्य तपासणी करून योग्य सूचना द्याव्यात.

पावसाळ्यातील साथीच्या आजाराबाबत देखील यानिमित्ताने तपासणी करावी. मुलांसाठी अद्याप लस उपलब्ध झाली नाही. तिसऱ्या लाटेचा जास्त धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी आरोग्य विभागाच्या मार्फत झोपडपट्टी भागात लहान मुलांसाठी आरोग्य शिबिर राबवावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.