kalewadi News: तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

Wakad News: Five arrested in youth murder case दोन दिवसांपूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम आणि आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये भांडण झाले होते.

एमपीसी न्यूज – वाकड येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

राज तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 23), प्रवीण ज्योतीराम धुमाळ (वय 21), अविनाश धनराज भंडारे (वय 23), अजय भारत वाकोडे (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे (वय 21), प्रेम वाघमारे (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम जनार्दन नखाते (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शुभमचे वडील जनार्दन आत्माराम नखाते (वय 52, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम आणि आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपींनी मयत शुभम याला थेरगाव येथील धोंडीराज मंगल कार्यालयात बोलावून घेतले.

सर्व आरोपींनी शुभमच्या डोक्यात, चेह-यावर, हातावर कोयत्याने वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.