Wakad News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच माहेरहून संसारोपयोगी वस्तू आणि पैसे आणण्याची मागणी करत छळ केला. हा प्रकार 8 मे 2002 ते 24 मे 2022 या कालावधीत जगताप डेअरी वाकड येथे घडला.

 

पती अविनाश गंगाधर अभंग (वय 46), सासरे गंगाधर अभंग (वय 70), सासू लाटा अभंग (वय 65), दीर प्रशांत अभंग, दीर रवींद्र अभंग (सर्व रा. जगताप डेअरी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. फिर्यादीकडे माहेरहून पैसे आणण्याची तसेच संसारोपयोगी वस्तू देण्याची मागणी केली. वस्तू देण्यासाठी नकार दिल्यानंतर वारंवार शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.