Wakad News : ‘साठे महामंडळासाठी भरघोस निधीची तरतूद केल्याने मातंग समाज समाधानी’

एमपीसी न्यूज – राज्याच्या अर्थसंकल्पात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत मातंग समाजाच्या वतीने दीपक चखाले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तसेच चखाले यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या सर्व संघटनांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर गायकवाड, किशोर खंडागळे, बाळासाहेब शिंदे, सचिन अडागळे अदि कार्यकर्ते उपस्थित होते.

चखाले म्हणाले, ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ निधीअभावी आर्थिक संकटात होते. अनेक योजना बंद पडल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या महामंडळाला शंभर कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला.

तसेच त्यांनी महात्मा फुले महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सर्व महामंडळासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.