Wakad News : लग्नाचे आमिष देऊन बलात्कार, आठ लाखाची फसवणूक ; मेट्रोमोनियल साईटवर झाली होती ओळख

एमपीसी न्यूज – मेट्रोमोनियल साईटवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष देत बलात्कार केला. तसेच, व्यावसायासाठी आठ लाख रूपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली आहे. 21 जुलै ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वाकड परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्चिक शुक्ला (रा. बालेवाडी, पुणे) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांची जीवनसाथी या मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केला. तसेच व्यावसायासाठी आठ लाख रूपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.