Wakad news: ताथवडे, पुनावळे परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र कर संकलन कार्यालय सुरु करा :राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – वाकड ताथवडे, पुनावळे  या भागातील नागरिकांना करविषयक कामकाजासाठी थेरगाव करसंकलन कार्यालयाशी सतत संपर्क करावा लागतो.  लांब असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी स्वतंत्र कर संकलन कार्यालय सुरु करण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, वाकड ताथवडे, पुनावळे हे परिसर नव्याने विकसित होत आहेत. वाकड ताथवडे पुनावळे येथील नागरिकांना करविषयक कामकाजासाठी थेरगाव करसंकलन कार्यालयाशी सतत संपर्क करावा लागतो. थेरगाव करसंकलन कार्यालयावरती एक लाखांपेक्षा जास्त मिळकातींचा भार असल्याने नागरिकांचे गैर सोय होत आहे.

त्यामुळे महापालिकेच्या थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामधील गट क्र.1 (कावेरी नगर ), गट क्र. 04 (वाकड), गट क्र.9 (पुनावळे) तसेच ताथवडे मधील सलग्न भाग ( गट क्र. 20,11 व 12) समाविष्ठ करून वाकड-ताथवडे पुनावळे किंवा भौगोलिक परस्थितिचा आढावा घेऊन येथील नागरिकांसाठी येथे स्वतंत्र करसंकलन विभागीय कार्यालय कार्यन्वित करणे
आवश्यक आहे.  वाकड-ताथवडे पुनावळे परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र कर संकलन कार्यालय सुरु होण्याबाबत आपले स्तरावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती कलाटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III