Wakad News : ‘आम्हाला पुढचा नगरसेवक असा हवा’, वाकड परिसरात झळकले हटके फ्लेक्स

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. राजकीय पक्ष, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हचाचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांमध्ये देखील निवडणूकीचा उत्साह दिसून येत आहे. अशात आगामी निवडणुकीच्या तोंडावर वाकड परिसरात लावण्यात आलेले हटके फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहेत.

भुजबळ चौक, वाकड येथील हिंजवडी कडे जाणा-या उड्डाण पूलाच्या संरक्षक भिंतीवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ‘आम्हाला नवीन प्रसूतीगृह बांधून देणारा नवीन नगरसेवक हवा आहे, होय मी गरीब महिला बोलतेय.’ ‘चिल्ड्रन्स पार्क बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी लहान मुलगा बोलतोय.’ ‘नवीन प्ले ग्राऊंड बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी खेळाडू बोलतोय.’ असा मजकूर या फ्लेक्स वरती छापण्यात आला आहे.

फ्लेक्सच्या माध्यमातून नवीन गार्डन, नाना नानी पार्क, फुटपाथ, प्रेक्षागृह असे विषय मांडण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लावण्यात आलेले हे फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नव्यानं निवडणूक लढवणा-या नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडे नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.दरम्यान, अशा प्रकारे उभारण्यात आलेले हे फ्लेक्स कुणी लावले आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.