Wakad : छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शहरात समता परिषदेचा ओबीसी मेळावा होणार

एमपीसी न्यूज – मुंबई येथे संपन्न झालेल्या महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत, पिंपरी-चिंचवड शहरात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी कार्यकर्त्यांसाठी समता घेण्यात येणार आहे.

मुंबई येथील महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत पिंपरी-चिंचवड शहर कार्यकरिणीचा’ कार्य-अहवाल संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडे शहराध्य अॅड चंद्रशेखर भुजबळ यांनी सुपूर्द केला.

  • यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने छगन भुजबळ यांना “पिंपरी-चिंचवड शहररात महात्मा फुले समता परिषद घेण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. या विनंतीस मान देऊन त्यांनी सहमती दर्शविली आहे. लवकरच नियोजित ओबीसी मेळाव्यासाठी तारीख देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यानुसार समता परिषदेची तारीख आणि इतर सर्व नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

१८ डिसेंबर २०१८ रोजी, महात्मा फुले समता परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २ मार्च २०१९ रोजी शहर कार्यकारणीचा पदनियुक्ती समारंभ आणि शहर कार्यालयाचा शुभारंभ करून आजपर्यंत शक्य झाली. ती सर्व कामे करण्याचा शहर कार्यकारिणीने अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

  • याची दखल घेत छगन भुजबळ यांनी पिंपरी चिंचवड शहरात समता पतिषदेचा मेळावा घेण्यास सहमती देत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे त्यादृष्टीने या मेळाव्यात काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.