Wakad Crime News : घरातून दीड लाखांचे दागिने, रोकड लंपास; एका संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरातून चोरट्याने एक लाख 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याबाबत एका संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. 27) रात्री साडेआठ या कालावधीत बेलठीकानगर, थेरगाव येथे घडली.

सिराज अहमद अब्दुलवफाक खान (वय 41, रा. बेलठिकानगर, थेरगाव. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 29) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून एक लाख 47 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने फिर्यादी यांच्या नकळत चोरून नेली. फिर्यादी यांचा अलिमुल्ला खान (रा. बेलठिकानगर) याच्या विरोधात संशय आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.