Wakad : महिलेला तलवार व दगडाने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज-  महिलेवर घरगुती कारणातून तिघांनी तलवार व दगडाने (Wakad) वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Wakad)ओंकार सुनील तिकोणे ( वय 21, रा .वाकड) त्याला अटक केली असून संजय तिवळे व सोमनाथ तिवळे दोघे राहणार वाकड यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

PMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या म्हतोबा नगर येथे त्यांच्या वहिनीकडे गेल्या होत्या. यावेळी( Wakad)आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला तू माझ्या बहिणीला पळून लावले होते असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी यांची वहिनी त्यांना समजवून सांगत असताना आरोपीने तलवारीने फिर्यादी यांच्यावर वार केला. मात्र तो चुकवला असता फिर्यादीच्या कानाला जखम झाली. तर दुसऱ्याने जीव घेण्याच्या उद्देशाने दगडाने मारहाण केली.

यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. यावरून वाकड पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.