Wakad : किराणा दुकानात अवैधरित्या गुटखा विकणाऱ्या एकाला अटक; 63 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरीत्या किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 63 हजार 396 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

मनोजकुमार श्रीलालजी मोर्या (वय 26, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे (वय 55) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोजकुमार यांचे नखाते वस्ती, रहाटणी येथे विनोद जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. त्याने दुकानात अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हे विक्रीसाठी ठेवले. याबाबतची माहिती फिर्यादी यांना मिळाली असता त्यांनी पोलिसांसह दुकानावर छापा मारला.

दुकानातून 63 हजार 396 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.