Wakad : चक्कर येऊन नदीत पडल्याने एकाचा मृत्यू!

एमपीसी न्यूज – नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या व्यक्तीला अंघोळ करताना चक्कर आली. त्यामुळे व्यक्ती नदीत पडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी बाराच्या सुमारास पुनावळे येथे पवना नदीपात्रात घडली.

राजेंद्र रामचंद्र जाधव (वय 45, रा. पुनावळे, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव हे रविवारी दुपारी पवना नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. चक्कर आल्याने ते पवना नदीमध्ये पडले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. जाधव यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

तिथून पुढील उपचारासाठी त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.