Wakad : ऑनलाइन शॉपिंग साईटद्वारे तरुणीची 67 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन शॉपिंग साईटद्वारे कपडे खरेदी केले. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कमी झाले. मात्र कपड्यांची ऑर्डर मिळाली नाही. याबाबत तक्रार करणाऱ्या ग्राहक तरुणीची तब्बल 67 हजार 553 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 31 मार्च ते 13 जून 2019 या कालावधीत वाकड येथे घडला.

दर्शिका राकेश सोमानी (वय 27, रा. कस्पटेवस्ती वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन मोबाईलधारक अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शिका यांनी कपडे खरेदी करण्यासाठी myntra हे मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड केले. त्यातून त्यांनी 2 हजार 555 रुपयांचे ऑनलाईन माध्यमातून कपडे खरेदी केले. या ऑर्डरसाठी दर्शिका यांच्या बँक खात्यातून पैसे कमी झाले. मात्र, त्यांना ऑर्डर मिळाली नाही. याबाबत दर्शिका यांनी ऑनलाईन तक्रार केली.

यानंतर आरोपीने [email protected] या मेलवरून दर्शिका यांना मेल केला. त्यात आरोपीने दर्शिका यांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला. दर्शिका यांनी मेलद्वारे मोबाईल क्रमांक दिला. मोबाईल क्रमांक मिळाल्यावर आरोपीने 7432934493 या क्रमांकावरून दर्शिका मेसेज केला आणि त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज 9945499454 या क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. दर्शिका यांनी त्याप्रमाणे मेसेज सांगितलेल्या क्रमांकावर पाठवला. यानंतर दर्शिका यांच्या बँक खात्यातून 64 हजार 998 रुपये कट झाले. आरोपीने एकूण 67 हजार 553 रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.