Wakad : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबण्यास सांगितल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूची साथ सुरू असल्याने कामावर न जाता घरीच थांबण्यास सांगणा-या व्यक्तीला एकाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी पावणेबाराच्या सुमारास राजवाडे नगर, काळेवाडी येथे घडली.

राजू मेलाराम वर्मा (वय 35, रा. राजवाडे नगर, काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सईद अहमद खान (रा. काळेवाडी, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा यांनी त्यांचा मित्र विजय यादव यांना सध्या कोरोना विषाणूची साथ सुरू असल्याने ‘तू घरीच थांब. खर्चासाठी काही पैसे लागत असतील तर मला सांग’ असे म्हटले.

या कारणावरून आरोपी खान याने फिर्यादी वर्मा यांना बोलावून घेऊन शिवीगाळ करत ‘तू माझ्या कामगारांना घरी बसण्यास सांगतो का’ असे म्हणून हाताने मारहाण केली. तसेच दगडाने वर्मा यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.