Wakad : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

एमपीसी न्यूज – बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार केला. गुन्हा मागे घेण्यासाठी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. ही घटना वाकड येथे घडली.

आबा मधुकर बर्फे (वय 36, रा. गणेश कॉलनी, भोसरी) असे दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2018 रोजी दिघी पोलीस ठाण्यात पिडित महिलेने आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. ही फिर्याद मागे घेण्यासाठी आरोपी वेळोवेळी पिडित महिलेचा पाठलाग करीत होता.

पीडित महिला 3 ऑगस्ट रोजी बस स्टॉपवर उभा असताना आरोपीने पिडीत महिलेच्या कमरेला चाकू लावला. चाकूचा धाक दाखवून तिला रिक्षातून वाकड येथील लॉजवर जबरदस्तीने नेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.