Wakad : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने दोन दारुड्यानी मिळून 19 वर्षीय तरुणाला दगडाने मारले. ही घटना पुरोहित स्वीट होम समोर थेरगाव येथे रविवारी (दि. 13) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

अमन सुनील कौशल (वय 19, रा. क्रांतिवीर नगर, थेरगाव) या तरुणाने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी भिलारे, प्रसाद थोरात (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमन मजुरीचे काम करतो. रविवारी कामावरून येत असताना त्याला थेरगाव येथे पुरोहित स्वीट होम समोर आरोपी भेटले. आरोपींनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. अमन याने पैसे दिले नाहीत. यावरून दोघांनी मिळून अमनला दगड फेकून मारला. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अमन जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.