Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण, महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – उधार देण्यासाठी दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे तरुणाने उधार मागणा-याला घरी जाण्यास सांगितले. या कारणावरून त्याने तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री अकराच्या सुमारास विक्रम सुपर मार्केट थेरगाव येथे घडली.

आरिफ शेख (रा. थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मावस भाऊ थेरगाव येथे विक्रम सुपर मार्केट येथे सामान आणण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपी आरिफ दुकानदाराला उधार सामान मागत होता. दुकानदाराने उधार सामान देण्यास नकार दिला. त्यावेळी महिलेच्या भावाने आरिफ याला घरी जाण्यास सांगितले. या रागातून आरिफ याने महिलेच्या भावाला शिवीगाळ करत लाकडी बांबूने हातावर, पायावर, तोंडावर मारून जखमी केले. त्यानंतर आरिफ याने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.