Wakad : दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाला तांब्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणी पिण्याचा तांब्या डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. त्याबाबत विचारणा केल्याने तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेणुनगर, वाकड येथे घडली.

सोनू गंगाधर नागरे (वय 20, रा. वेणूनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर भंडारी (रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागरे घरी झोपलेले असातना आरोपी भंडारी तेथे आला. त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र फिर्यादी नागरे यांनी पैसे दिले नाहीत. त्याचा राग मनात धरून आरोपी भंडारी याने घरातील पाणी पिण्याचा तांबा डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी यांच्या आई मीना नागरे गेल्या असता आरोपी भंडारी याने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.