Wakad: ‘शादी डॉट कॉम’वरून झालेली ओळख अभियंता तरुणीला पडली अडीच लाखाला

एमपीसी न्यूज – ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून ‘गिफ्ट’ पार्सल पाठविल्याचे सांगत ते सोडविण्यासाठी 2 लाख 47 हजार रुपये भरायला लावून अभियंता तरुणीची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.24)उघडकीस आला.

याप्रकरणी वाकड परिसरात राहणा-या 31 वर्षीय संगणक अभियंता तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात मोबाईल धारकांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करत आहे. तरुणीने विवाह जुळविणा-या ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. या संकेतस्थळावरुन आरोपी आणि तरुणीची ओळख झाली. आरोपींनी तरुणीशी संपर्क वाढविला. लग्नाचे आमिष दाखविले. ‘गिफ्ट’ पार्सल पाठविल्याचे सांगून ते पार्सल कस्टममध्ये अडकल्याचे सांगितले.

तसेच टेररिस्ट अॅक्टनुसार कारवाई होईल अशी भीती दाखवत, वेगवेगळे कर आणि फी च्या नावाखाली आरोपींनी त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 लाख 47 हजार रुपये तरुणीला भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर देखील ‘गिफ्ट’ न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसात धाव घेतली. आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.