Wakad: क्रेडीट कार्डची माहिती घेऊन 50 हजार रुपये केले ‘ट्रान्सफर’

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे कार्डवरुन 50 हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (दि.24)रात्री सव्वानवच्या सुमारास वाकड येथे घडली.

याप्रकरणी संजय शंकर पाटील (वय 29, रा. स्वामी विवेकानंदनगर, वाकड)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय पाटील यांच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास 9205521412 या क्रमांकावरुन त्यांच्या मोबाईलवर फोन आला. एसबीआय क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन पाटील यांच्याकडून कार्डची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे पाटील यांच्या कार्डमधून 50 हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन घेतले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.