Wakad : तरुणाला सव्वा लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- एअरलाईन्स कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी करून बँक खात्याची वैयक्तिक माहिती विचारात तरुणाला सव्वा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुरुवारी (दि.5) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एका 20 वर्षीच्या युवकाने फिर्याद दिली असून अज्ञात मोबाइलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांना अज्ञात मोबाइलधारकांनी फोन केला. पायल सिंग व कृष्णा ठाकुर असे नाव सांगत एअर लाईन्सच्या हेडऑफीस मधून बोलत असल्याची बतावणी केली. विविध कारणे सांगत त्यांना बँक खात्याची वैयक्तिक माहिती विचारली. त्यांच्यावर विश्वास ठेवून युवकाने माहिती दिली असता १ लाख १४ हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.