Wakad : ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एकाला हजारोंचा गंडा

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वरून जुनी कार कमी किमतीत विकण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाला 26 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना 27 ते 29 मे 2019 या कालावधीत वाकड येथे घडली.

वपुल कुमार अमोद कुमार शाही (वय 31, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी 9772793075 आणि 9587733045 या क्रमांकावरून फिर्यादी वपुल यांना फोन केला. ओएलएक्स वरून जुनी कार कमी किमतीत विकण्याचे आरोपींनी वपुल यांना अमिश दाखवले. त्यासाठी आगाऊ रक्कम भरण्यास सांगून वपुल यांच्या बँक खात्यातून 26 हजार रुपये त्यांच्या पेटीएम बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.