Wakad : परिवर्तन सोशल फाऊंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त गणेशनगर थेरगाव येथील परिवर्तन सोशल फाऊंडेशन संस्थेतर्फे वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी आज (रविवारी) आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये हाडांची घनता आणि ठिसुळता तपासणी करण्यात आली. तसेच ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

शिबिराचे उद्घाटन वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, थेरगांव सोशल फाऊंडेशनचे अनिकेत प्रभु, प्रशांत चव्हाण, शेखर गांगर्डे, अनिल घोडेगर, आनंद जाधव, अभिजीत खानविलकर, शुभम चौधरी आदी उपस्थित होते.

  • तपासणी आरोग्य अधिकारी म्हणून डाॅ. सुधीर लामखडे, डाॅ. सारिका हडवळे, डाॅ. चंकी नरयाणी आणि चंद्रकांत मेमाने यांनी काम पाहिले. या शिबिरामध्ये 90 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे आयोजन परिवर्तन सोशल फाऊंडेशनचे राहुल सरवदे, दशरथ रणपिसे, प्रकाश गायकवाड, सचिन क्षीरसागर, तुषार कांबळे, रोहित ढोबळे, मयुर कांबळे, गोपाळ पांचगे, राकेश गवळी, राहुल जाधव, अंतोष शिंदे, राम गवळी आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.