Wakad crime News : दोन्ही मुलीच झाल्या म्हणून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन मुलीच झाल्या तसेच माहेरच्या लोकांनी कमी पैशांत लग्न उरकले या कारणांवर सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 8 फेब्रुवारी 2010 पासून 15 मार्च 2020 या कालावधीत पडवळनगर, थेरगाव येथे घडला.

सासू निर्मला विजय ओव्हाळ (वय 55), सासरे विजय नामदेव ओव्हाळ (वय 60), पती सुशील विजय ओव्हाळ (वय 35), दीर सुजित विजय ओव्हाळ (वय 33), जाऊ वैशाली सुजित ओव्हाळ (वय 32), चुलत नणंद रितू प्रकाश कांबळे (वय 31, सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी ‘तुझ्या आई-वडिलांनी नीट लग्न लाऊन दिले नाही. कमी पैशात लग्न उरकले’, असे म्हणून दीर सुशील याच्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

फिर्यादी महिलेला दोन्ही मुलीच झाल्या. या कारणावरून आरोपींनी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. वेळोवेळी उपाशी ठेऊन, घालून पाडून बोलून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.