Wakad : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी वेल्डर म्हणून काम करत होता.

सुनील वसंत सोळेस (वय 28, रा. पुनावळे, माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना पुनावळे येथील स्वागत वॉशिंग सेंटर येथे एक तरुण पिस्तुलाची विक्री करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुनील याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल सापडले. यावरून त्याला अटक करण्यात आली. सुनील याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, जोरजबरदस्ती करणे, धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील बिभीषण कन्हेरकर, गणेश गिरीगोसावी, सुरेश भोसले, अशोक दुधवणे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.