Combing Operation : वाकड पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, दोन सराईत आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांकडून काल (दि. 25 जून) रात्री 12 वा ते पहाटे 2 च्या दरम्यान कॉम्बिंग ऑपेरेशन (Combing Operation)  राबवण्यात आले. यावेळी दोन सफाईदार, फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्याकडून आयुक्तालाय हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपेरेशन राबविण्याचे आदेश देण्यात आले होते

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक गुन्हे रामचंद्र घाडगे, पोलिस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील व संभाजी जाधव व पोलिस अंमलदार यांना प्रभावी कॉम्बिंग ऑपेरेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, काॅंबिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार तसेच संशयित व्यक्ती, वाहने यांची तपासणी करीत असताना काल 25 जूनला रात्री 1.40 च्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील व अंमलदार यांना पंडित पेट्रोल पंप समोर, डांगे चौक रोड वाकड येथे एका मोटरसायकलवरून तीन व्यक्ती गडबडीने जाताना दिसले. तेव्हा त्यांचा पाठलाग करताना तीन जणांपैकी एक जण मोटर सायकलवरून उडी मारून अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. उर्वरित दोघांना ताब्यात घेतले, तेव्हा त्यांच्याकडे सखोल विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे सांगितली.

Todays Horoscope 26 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

शरद मलाव (वय 21 वर्षे, रा. शिरूर) आणि आशुतोष काळे (वय 22 वर्षे, रा. शिरूर) अशी त्यांची नावे सांगितली आहेत. त्यांना पळून गेलेल्या इसमाबद्दल चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की तो इम्रान, रा. चिंचवड होता. त्यांना आणखी विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

त्यांच्या हालचाली संशयस्पद वाटल्याने त्यांची अंगझडती घेतली असता एक लांब लोखंडी तलवार मिळाली. त्यांच्याबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी अभिलेख तपासात पाहिले असता हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात भा ह का कलम 4, 25 सह कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पळून गेलेल्या इस्माबाबत अधिक तपास करताना अभिलेख तपासल्यावर कळाले की त्याचे नाव इम्रान शेख, (वय 22 वर्षे, रा. चिंचवड) आहे व तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला चिंचवड पोलूस ठाण्याकडून तडीपार करण्यात आले आहे.

पकडलेल्या दोन आरोपींकडे अधिक तपास करत असताना माहिती मिळाली की 21 जून 2022 ला शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभव भोईनल्लू, वय 22 वर्षे, रा. शिरूर यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार करून, गंभीर जखमी करून तेथून फरार झाले होते.

याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 307, 109, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. शिरूर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण यांना आरोपिंना अटक केल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोपी शरद मअल्लाव याच्यावर हडपसर पोलिस ठाणे, रांजणगाव पोलिस ठाणे, शिरूर पोलिस ठाणे मध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच  आरोपी आशुतोष काळे याच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.