Wakad : टिक-टाॅक वर ‘वाढीव’ व्हिडिओ करणाऱ्याला पोलिसांनी दिला ‘वाढीव प्रसाद’ (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणाने टिक-टॉक चा वापर करून ‘वाढीव दिसताय राव…’ या लावणीवर एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये त्याने कोयत्यासारखे शस्त्र हातात बाळगले आहे. हा वाढीव व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात आणून ‘वाढीव’ प्रसाद दिला.

दीपक आबा दाखले (वय 23, रा. रहाटणी) असे पोलिसांकडून वाढीव प्रसाद मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.

दीपक याने टिक-टॉक चा वापर करून ‘वाढीव दिसताय राव …’ या लावणीर एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये दीपक लोखंडी कोयत्या सारखे शस्त्र घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने बनवला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला. व्हिडिओ पाहताच पोलिसांनी दीपकला सापळा रचून ताब्यात घेतले. ‘वाढीव’ व्हिडिओ बाबत चौकशी करत पोलिसांनी दीपकला चांगलाच ‘वाढीव प्रसाद’ दिला. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व आर्म ॲक्ट प्रमाण गुन्हाही नोंदवला. दीपक याच्यावर यापूर्वीदेखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.