Pimpri Crime : गुजरात तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सराईतपणे घरफोड्या करणाऱ्या चोरांना वाकड पोलिसांनी केले गजाआड

एमपीसी न्यूज गुजरातमध्ये सराईतपणे 16 घरे फोडून दहशत माजवणाऱ्या दोन अट्टल चोरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. (Pimpri Crime) यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरातही त्यांनी 16 घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.  पोलिसांनी त्यांच्याकडून 24 लाख 68 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय 28), सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय 26, रा. दोघे रा, वडनगर, जि. म्हैसाना, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत मधील शिंदेवस्ती येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, प्रमोद कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून लखनसिंग आणि सतपालसिंग यांना ताब्यात घेतले. (Pimpri Crime) त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पोपट पाना असे साहित्य मिळाले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीचे विविध ठिकाणी गुन्हे केले असल्याचे सांगितले.

PCNTDA : ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न वर्षभरात निकाली निघेल

आरोपींनी 2019 ते 2022 या कालावधीत गुजरात मधील वडोदरा, गांधीधाम, पालमपूर, गांधीनगर, पाटण परिसरात 16 घरे फोडून ते पसार झाले होते. पुढे ते पिंपरी-चिंचवडला आले त्यांत त्यांनी केवळ तीन महिन्यात 16 घरे फोडली आहेत. यात चक्क एका पोलीस वसाहतीत पोलिसाचेच घर फोडले कावेरीनगर पोलीस वसाहत वाकड येथे घरफोडी झाल्याचा प्रकार 17 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. ज्यामध्ये त्यांनी घरातून सहा लाख 28 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार (Pimpri Crime) वंदू गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, संतोष बर्गे, दिपक भोसले, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.