Wakad : हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की; एकाला अटक

एमपीसी न्यूज – हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 9) रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हातोबानगर, वाकड येथे घडला.

गणेश हिरामण काळे (रा. म्हातोबानगर, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी सोमवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आरोपी काळे हा सार्वजनिक रस्त्यावर हातात कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक माने यांनी घटनस्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काळे याने त्याच्या हातातील कोयता उगारून माने यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.