Pimpri : संभाजी बिग्रेडच्यावतीने धाडसी वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज – एेन दिवाळीत थेरगाव येथुन एका पाच वर्षाच्या मुलाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहऱण झाले होते. एेन दिवाळीत या घटनेने शहरासह पोलीस  प्रशासन  हादरुन  गेले होते. मात्र वाकड पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी  दाखवलेली  तत्परता अन हुशारीमुळे खंडणीखोर अपरहणकर्ते पोलिसांच्या  ताब्यात आले.  

पिंपरी-चिंचवड शहरवासीय दिवाळीसारखा सण आपल्या कुटुंबियासह साजरा करत असतानाच दुस-या बाजूला मात्र वाकड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी चार दिवस  दिवाळीसारखा सण सोडून अहोरात्र आपले कर्तव्य बजावले. थेरगाव येथील सुफियान रविवारी दुपारी पार्किंगमध्ये खेळत असताना तिथे त्याला एकाने आ सुफियान गाडी में बैठ असे म्हणत त्याला पळवून नेले होते. या घटनेची वरीष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने यांनी गांभीर्याने दखल घेत 60 पोलिसांची वेगवेगळी पथके नेमली. व  कर्तव्यतत्परता दाखवून पोलिसांनी हे यश मिळविले.
या घटनेनंतर  सुफियानच्या  कुटुंबियांनी व वाकड पोलिसांनी वाकड पोलिसी स्ठेनमध्येच फटाके फोडत दिवाळी साजरी केली. ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मराठा सेवा संघ संभाजी  ब्रिगेडच्यावतीने वाकड पोलीस, स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने, पोलीस निरिक्षक (गुन्हे) सुनील पिंजण,  सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश स्वामी, पोलीस उपनिरिक्षक हरीष माने, हेमंत हांगे, सुदर्श कापरे, बापुसाहेब धुमाळ, विभीषण कन्हेरकर, तानाजी भोगाम व त्याच्या सहकार्यांचा राष्ट्रमाता जिजाऊंची  प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे प्रकाश जाधव,  संभाजी  ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव, ज्ञानदेव लोभे, अशोक शेंडगे आदी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.