Wakad : ‘शिवबा ढोल ताशा पथक’ प्रमुखाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – ‘शिवबा’ ढोल ताशा पथकाच्या संस्थापक अध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आला.

प्रथमेश शिवाजी कारके (वय 23, रा. गुजरनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा थेरगाव येथील शिवबा ढोल ताशा पथकाचा संस्थापक अध्यक्ष होता. त्याने सोमवारी दुपारी घरात कोणीही नसताना नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेशच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यँत समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.