Wakad Traffic : वाकडमध्ये भयंकर ट्रॅफिक जॅम ; ट्राफिकचे नक्की कारण काय?

 एमपीसी न्यूज :  वाकड येथून जाणाऱ्या पुणे-मुंबई बायपास मार्गावर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. (Wakad Traffic) वाकड येथील भूमकर चौक येथे जाताना कायमच थोड्या फार प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. परंतु आज भूमकर चौकात इतर वेळेपेक्षा जास्त ट्रॅफिक पहायला मिळाली. भूमकर चौकाबरोबरच ताथवडे एंटर पास व भुजबळ चौकातही ट्रॅफिकचा सामना करावा लागला. 

आज संध्याकाळी पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचले होते . वाहतूक पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक मंदावली होती . त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली . संध्याकाळी हिंजवडीतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सुट्टी होते म्हणून कायम रहदारी असतेच परंतु आज पावसामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

 

Pune : व्हेरॉक अ-16 स्पर्धा संपन्न; व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा दमदार विजय

नागरिकांच्या म्हणण्यानुसार भूमकर चौकात नवीन झालेल्या वन वे मुळे ही रहदारीची अडचण झाली असावी. गाड्यांचा साधारण  2 किलोमीटर पर्यंत रांगा  लागल्या होत्या.(Wakad Traffic) सध्या वाहतूक पोलीसांकडून ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यात आली आहे. नागरिक नियमांचे पालन करत नाहीत हे ही या वाहतूक कोंडी होण्या मागचे एक कारण आहे..

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.