Wakad : पादचारी तरुणीची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या तरुणीची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेली. ही घटना कोकणे चौक रहाटणी येथे मंगळवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास घडली.

शिफाली प्रवीण झारखडीया (वय 26, रा. कोकणे चौक, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिफाली मंगळावरी रात्री दहाच्या सुमारास कोकणे चौकातून जात होत्या. त्या चितळे बंधू स्वीट्स या दुकानासमोर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिफाली यांच्या हातातील पर्स हिसकावली. चोरट्यांनी पर्समधील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 7 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.