Wakad : कार पार्क करण्यावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – मोटार पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरूणास मारहाण करण्यात आली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. 

गोविंद बाबुराव राऊत (वय 26, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बबलू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी राऊत यांनी आपली कार भूमकर चौक येथे उभी केली. त्यावेळी तिथे आलेला तोंड ओळखीचा आरोपी गायकवाड याने ‘तू येथे गाडी लावायची नाही’ असे म्हणत मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. तसेच शिवीगाळ करीत रस्त्यावरील दगड फिर्यादी राऊत यांच्या डोक्यात मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.