Wakad crime News : लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार; साडेपाच लाख रुपये आणि दोन सोन्याच्या अंगठ्याही लुबाडल्या

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेची आणि तिच्या मुलाची सर्वस्वी जबाबदारी घेण्याचे सांगत महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबध ठेवले. तसेच तिच्याकडून लाखो रुपये आणि सोन्याच्या अंगठ्या घेऊन त्या परत दिल्या नाहीत. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव खंडू पारखी (रा. काळा खडक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव याने फिर्यादी महिलेला ‘तुझी व तुझ्या मुलाची सर्वस्वी जबाबदारी घेईन. तुम्हा दोघांचा निट सांभाळ करीन’ असे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.

पीडित महिलेकडून आरोपीने साडेपाच लाख रुपये आणि 14 ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. पैसे आणि अंगठ्या आरोपीने महिलेला परत दिल्या नाहीत. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

हा प्रकार सन 2011 पासून सप्टेंबर 2020 पर्यंत फिर्यादीच्या घरी, वाल्हेकरवाडी, ताथवडे, किवळे, सोमाटणे फाटा येथे वेळोवेळी घडला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.