Wakad : एटीएम फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल; चोरट्यांनी लांबवले 12 लाख 84 हजार रुपये

0

एमपीसी न्यूज – गॅस कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम फोडले. मशीनमधून चोरटयांनी 12 लाख 84 हजारांची रोकड लांबवली. ही घटना बुधवारी (दि. 12) सकाळी दहाच्या सुमारास लिंक रोड, रहाटणी येथे उघडकीस आली.

अजय लक्ष्मण कुरणे (वय 37, रा. माळवाडी, आळंदीरोड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील लिंकरोड येथे आरबीएल बँकेचे एक एटीएम केंद्र आहे. चोरटयांनी मंगळवारी (दि. 11) रात्री एटीएम केंद्रात प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने मशीन उचकटले व आतील 12 लाख 84 हजार 100 रुपयांची रोकड चोरून नेली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीकांत मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. त्यावरून पोलीस पथके देखील रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शहरात एटीएम फोडून रक्कम लांबवल्याचा तसेच प्रयत्न केल्याच्या घटना लागोपाठ सुरु आहेत. या घटना थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी विशेष गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील गस्तही वाढवण्यात आली आहे. मात्र, तरी देखील भरवस्तीतील एटीएम फोडून चोरटे पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like