Wakad: तरुणीचा लग्नासाठी नकार; तरुणाकडून घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण

Wakad: refusal of a young woman to marry; The youth broke into the house and beat up the family याप्रकरणी परस्पर विराधोत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एमपीसी न्यूज- तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिच्या आई, वडील व भाऊ यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच कोयत्याने एकावर वार केले. त्यानंतर गॅरेजमधील दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि.17) वाकड येथील 16 नंबर बसथांब्याजवळ घडली. याप्रकरणी परस्पर विराधोत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात 19 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण सुबेदार जैस्वार (वय 22, रा. पंचशील कॉलनी, वाकड) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरात असताना आरोपी घरात आला. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे आरोपी म्हणाला. त्याला फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने गैरवर्तन करून तरुणीचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या आई, वडील व भाऊ यांना शिवीगाळ करून धमकी दिली.

फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण केली. त्यानंतर याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादीच्या आई व वडिलांसोबत पोलीस चौकीत गेल्या. त्यावेळी आरोपी त्याच्या दोन साथीदारांसोबत फिर्यादीच्या घरी गेला.

घराजवळ फिर्यादीच्या वडिलांचे गॅरेज आहे. वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या संदीप शर्मा या कामगाराला कोयत्याने मारले. यात संदीप शर्मा जखमी झाला. तसेच गॅरेजमधील दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात करण जैस्वार यानेही वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची नातेवाईक असलेली तरुणी ही फिर्यादी करण याची मैत्रीण आहे. याचा तरुणीच्या वडिलांना राग आला. त्यामुळे त्यांनी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण जैस्वार याला 16 नंबर बसथांब्याजवळ बोलावून घेतले.

‘तुला लय माज आला आहे’, असे म्हणून करण याला लोखंडी पान्हा, रॉडने मारहाण केली. यात करण जखमी झाला. पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना अटक केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.