Wakad : कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन जनावरांची सुटका; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कत्तल करण्यासाठी जनावरांना घेऊन जाताना एका टेम्पोवर कारवाई करत वाकड पोलिसांनी दोन जनावरांची सुटका केली आहे. टेम्पोमधील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 25) सायंकाळी सात वाजता विजयनगर काळेवाडी येथे केली आहे.

प्रसाद रोहिदास गायकवाड (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) आणि त्याचा साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश मच्छीन्द्र नढे (वय 26) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सात वाजता आरोपी एका टेम्पोमधून (एम एच 14 / ई एम 7230) दोन जनावरे घेऊन जात होते. टेम्पोमध्ये जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात आलेली नव्हती.

जर्सी गाय आणि म्हैस या दोन जनावरांना आरोपी कत्तल करण्यासाठी घेऊन जात होते. याबाबत गुन्हा दाखल करत 30 हजार रुपये किमतीच्या दोन जनावरांची सुटका करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.