BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : दारू पिताना झालेल्या भांडणातून रिक्षाचालकाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या भांडणातून एका रिक्षाचालकाचा खून केला. या प्रकरणी दोघांनी वाकड पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी घडली. मयत तरुणाचा मृतदेह रविवारी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आढळून आला.

रोहित किसन कांबळे (वय 19, रा. वाकडरोड, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत रोहित यांची आई मीना किसन कांबळे (वय 45) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इलियाज शेख (वय 30, रा. पवारनगर, थेरगाव) आणि आकाश साळवे (वय 25) यांना अटक केली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दारू पिण्यासाठी आरोपी आणि मयत असे तिघेजण दारू पिण्यासाठी मावळ परिसरात येथे गेले. तिथे मयत याने आरोपीच्या अंगावर लघुशंका केली. या कारणावरून आरोपींनी रोहित याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह संगमवाडी येथील पुलावरून नदीपात्रात टाकला. आरोपींबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खूनाची कबुली दिली. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.