BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : शस्त्रांचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चौघांनी डिलिव्हरी बॉयला लुटले. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री सव्वाआठच्या सुमारास सयाजी हॉटेल समोर वाकड येथे घडली.

प्रदीप तुकाराम कांबळे (वय 27, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप बिग बास्केट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रविवारी रात्री बिग बास्केट कंपनीची डिलिव्हरी देण्यासाठी ते त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / ईए 6635) जात होते.

वाकडमधील सयाजी हॉटेलसमोरून जात असताना दोन मोपेड दुचाकीवरून चार अनोळखी तरुण आले. त्यांनी प्रदीप यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून 18 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

.