Wakad : घरफोडी करून पावणे पाच लाखांचा ऐवज पळवला;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे रविवारी (दि. 1) रात्री उघडकीस आली.

नितीन नंदलाला गोगिया (वय 43, रा. समर्थ कॉलनी, काळेवाडी) यांनी मंगळवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन हे रविवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम असा एकूण चार लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.