Wakad : संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सागर भूमकर प्रथम क्रमांकाचे मानकरी

एमपीसी न्यूज- वाकड येथील प्रगतशील शेतकरी सागर मोहन भूमकर यांना श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला यावर्षीच्या गळीत हंगामात 819 मेट्रिक टन ऊसाचा पुरवठा करीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, आमदार सुनील शेळके, भागवतचार्य चंद्रकांत महाराज वाजंळे, संचालक चेतन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संतोष महाराज पायगुडे, माजी आमदार कृष्णाराव भेगडे, दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, माऊली दाभाडे, भाऊसाहेब भोईर, माजी संचालक बाळासाहेब विनोदे यांच्यासह सर्व संचालक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भूमकर यांनी सन 2013-14 मध्ये द्वितीय क्रमांक, 2014-15 मधे तृतीय क्रमांक, 2015-16 मधे प्रथम क्रमांक पटकविला होता. 2018-19 वर्षाच्या 22 व्या गळीत हंगामात 891 मेट्रिक टन ऊसाचा पुरवठा करीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भूमकर हे संत तुकाराम सहकारी कारखान्यासह आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देखील मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा करतात.

सध्याच्या सिमेंटच्या जंगलात देखील उत्तम प्रकारची आधुनिक शेती ते करत आहेत. त्यामुळे एक प्रगतशील शेतकरी म्हणून भूमकर परिवाराकडे पाहिले जाते. सलग चौथ्यांदा त्यांना हा पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.