Wakad : संभाजी ब्रिगेड करणार वाकड पोलीस ठाण्यासमोर अर्धनग्न आंदोलन

एमपीसी न्यूज – महिलेला फोन करून अश्लील बोलणी केल्याबाबत वाकड पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्याचा दखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी संभाजी ब्रिगेड-पुणे जिल्हा यांच्या वतीने रविवारी (दि. 25) वाकड पोलीस ठाण्याच्या समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेड-पुणे जिल्हाचे उपाध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.

सतीश काळे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, काळे यांच्या पत्नीच्या मोबाईल फोनवर 9373033026 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्ती त्यांच्या पत्नीला अश्लील आणि अर्वाच्य भाषेत बोलला. याबाबत 29 जुलै रोजी थेरगाव पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी काळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांना विनंती केली. मात्र, अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंद केला नाही. पोलिसांकडून जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काळे यांनी निवेदनात केला आहे. काळे संपूर्ण कुटुंबासह वाकड पोलीस ठाण्यासमोर रविवारी अर्धनग्न आंदोलन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.