Wakad : रोडवर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारचे टायर पळवले!

एमपीसी न्यूज – रोडवर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारचे दोन टायर अज्ञात चोरट्यांनी काढून नेले. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी रहाटणी येथील बीआरटी बसस्टॉप जवळ उघडकीस आली.

नंदकिशोर सुभाष शहाणे (वय 26, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर यांनी त्यांची एमएच 23 / ए एस 7077 ही स्कॉर्पिओ कार मंगळवारी (दि. ३) संध्याकाळी अकराच्या सुमारास रहाटणी येथील बीआरटी बसस्टॉप जवळ पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी कारची पुढच्या बाजूचे 16 हजार रुपये किमतीचे दोन टायर व्हीलसह काढून नेले. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.